ola uber rapido
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - राज्यातील बेकायदा बाईक टॅक्सी सेवांविरोधात महाराष्ट्र शासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवासी सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा आणि परिवहन नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने ओला, उबर आणि रॅपिडोची ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्याबाबत गुगलला माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत नोटीस बजावली आहे. परिवहन मंत्र्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.