एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! शाळा सुरु होताच विद्यार्थ्यांना शाळेतच एसटी बसचा पास; मुलींना मोफत पास, तर मुलांना मासिक पासमध्ये ६७ टक्के सवलत

आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्व शाळा-महाविद्यालयांमध्येच एसटी बसचा मोफत तसेच सवलतीचा पास मिळणार आहे. बसचा पास काढण्यासाठी त्यांना आगारात किंवा बस स्थानकात जावे लागणार नाही. ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या दारी’ अशी मोहीम विद्यार्थ्यांच्या पाससाठी राबविण्यात येणार आहे.
ST Bus
ST Busesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्व शाळा-महाविद्यालयांमध्येच एसटी बसचा मोफत तसेच सवलतीचा पास मिळणार आहे. बसचा पास काढण्यासाठी त्यांना आगारात किंवा बस स्थानकात जावे लागणार नाही. ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या दारी’ अशी मोहीम विद्यार्थ्यांच्या पाससाठी राबविण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७६८, तर माध्यमिकच्या ९८१ शाळा आहेत. याशिवाय उच्च महाविद्यालयांची संख्या १३० पर्यंत आहे. या शाळांमध्ये सुमारे तीन लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांसह आयटीआय व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एसटी बसमधून शाळा-महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी सवलतीचा पास मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी शाळांना भेटी देत आहेत.

याशिवाय प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पास हवे असल्यास ते देखील थेट संबंधित आगार किंवा विभागाशी संपर्क साधू शकतील, असे सोलापूरचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस प्रवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलींना एसटी बसच्या पाससाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. दुसरीकडे मुलांना मासिक पासच्या रकमेपैकी अवघी ३३ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

शाळेतच मिळतील विद्यार्थ्यांना बसचे पास

१५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांची यादी आम्ही घेतली असून आमचे अधिकारी शाळांना भेटी देत आहेत. यंदा आमचे अधिकारी शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देतील. विद्यार्थ्यांच्या मार्गांवरील सर्व बसगाड्या वेळेत धावतील, याचे नियोजन केले आहे.

- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर

शाळेच्या बोनाफाईडवर मिळेल पास

इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात दररोज ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचा सवलतीचा प्रवासी पास मिळतो. त्यासाठी विद्यार्थी ज्या शाळा-महाविद्यालयात शिकत असेल, तेथील प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे बोनाफाईड आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा एक फोटो लागतो. त्याचबरोबर महामंडळाचा एक अर्ज भरून द्यावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com