Makar Sankranti : तिळ मूळचा भारतीय आहे का? असा आहे तिळाचा इतिहास

संक्रांत, नव्या वर्षातील पहिला सण.
Makar Sankranti
Makar Sankrantiesakal
Updated on

Makar Sankranti : संक्रांतीचा सण तोंडावर आलाय. घरी तिळगुळाच्या वड्या बनवण्याची तयारी सुरू झाली असेल. तिळगूळ घ्या गोड बोला चे मेसेज तयार होत असतील. संक्रांत, नव्या वर्षातील पहिला सण. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रमण असे म्हणतात व या काळात उत्पन्न झालेल्या शक्तीला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते.

Makar Sankranti
Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खायचे, त्यात तीळ अग्रणी ठरावेत. म्हणूनच संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हा जणू परवलीचा शब्द असतो. संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्त्व इतके की त्यांचा होता होईल तेवढा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत असते. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो हा भारतीय संस्कृतीमध्ये इतकं महत्व असलेला हा तिळ मूळचा कुठला? त्याचा उगम कुठे झाला असावा.

Makar Sankranti
Parenting Tips: आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

मराठी विश्वकोश मध्ये असलेल्या उल्लेखानुसार तिळाचे मूलस्थान आफ्रिका असून फार प्राचीन काळी तेथून भारतात स्थलांतर करून आलेल्या मनुष्यांनी ती आणली असावी. सिंधूच्या खोऱ्यातील प्राचीन संस्कृतीत ती लागवडीत असावी, असे हडप्पाच्या उत्खननात (इ. स. पू. ३६००–१७५०) सापडलेल्या जळक्या तिळाच्या दाण्यांवरून दिसून येते. आशिया व आफ्रिका या खंडांतील प्राचीन काळातील तिळाच्या लागवडीमुळे तिचे मूलस्थान विवादास्पद आहे.

Makar Sankranti
Angarki Sankashti Chaturthi: संकष्टीच्या उपवासाला चालणारा बटाटा भारतात कधी आला

आफ्रिकेतील ॲबिसिनिया हे तिळाच्या रानटी पूर्वजांचे प्राथमिक उगमस्थान असावे आणि मध्य भारत, आसाम व ब्रह्मदेश येथे लागवडीतील जातींचा उगम झाला असावा, असे काही तज्ञ मानतात तसेच चीनमधील मध्य व पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश हा लागवडीतील जातींचे दुय्यम मूलस्थान असावे. तेथील प्रमुख प्रकार खुजे आहेत.

Makar Sankranti
Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

यांशिवाय आणखी दोन प्रमुख उगमस्थाने आहेत : यांपैकी एक पंजाब, काश्मीर, पाकिस्तान व अफगाणिस्तान असून दुसरे इराण व तुर्कस्तान हे आशिया मायनरमधील प्रदेश आहेत. येथे तिळाची दुसरी उपजाती (सि. बायकार्पेलेटम) मुख्यतः लागवडीत आहे. या दोन प्रकारच्या (प्राथमिक व दुय्यम) उगमस्थानांतून तिळाची वाटचाल दोन मार्गांनी झाली : पूर्वेकडे चीन व इंडोचायना यांमधून जपानकडे आणि पश्चिमेकडे भूमध्यसामुद्रिक प्रदेशाकडे. भारतातील लागवडीत असलेल्या सर्वांत प्राचीन धान्यांपैकी तीळ हे एक असून तैत्तिरीय व शोनक संहितांच्या काळापासून त्याचा उल्लेख आढळतो.

Makar Sankranti
Tashkent Files : नक्की का झालेला ताश्कंद करार? कोणती कलमं झालेली यात मंजूर?

‘होमधान्य’ आणि ‘पितृतर्पण’ असाही त्याचा उल्लेख आहे. भारतातील अनेक भाषांतील तिळाची नावे ‘तिल’ या संस्कृत नावाशी संबंधित दिसतात. तैल (तेल) हा संस्कृत शब्द ‘तिल’ या शब्दावरून रूढ झाला. हिंदू लोक अद्याप अनेक धार्मिक विधींत तीळ वापरतात. संक्रांतीच्या दिवशी ‘तिळगूळ’ परस्परांना देऊन शुभेच्छा प्रकट करतात या सर्व गोष्टी विचारात घेतल्यास तिल (तीळ) ही ओषधी भारतीय असावी, असा ग्रह होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com