समूह विकास योजना यशस्वी करा - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि शक्‍य असेल तिथे सामाजिक दायित्व निधी मिळवून सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठीची "समूह विकास योजना' वेगाने आणि यशस्वीरित्या पूर्ण करावी, अशी सूचना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. 

सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची संकल्पना केंद्र आणि राज्य शासनाने स्वीकारली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

ते म्हणाले, की राज्यातील रोजगारनिर्मिती वाढावी, यासाठी औद्योगिक समूह विकास योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. परंतु, समूह विकास योजनेतून प्रकल्प वेळेत उभे राहिले तर त्याचा खर्च कमी होतो आणि त्याचे यशस्वितेचे प्रमाणही वाढते हे लक्षात घेऊन या एकूण सर्व प्रक्रियेला लागणारा कालावधी चांगले काम करूनही कमी कसा करता येईल, याचा उद्योग संचालनालयाने अभ्यास करावा. 

Web Title: Make the group development plan successful