
अनिल बोंडेवर गुन्हा दाखल; जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा आरोप
अमरावती : जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपखाली भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करताना अचलपूर घटनेच्या त्या मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं होतं. हा आरोप करताना त्यांनी जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. (Making a statement that creates Ethnic rift FIR filed against Anil Bonde)
हेही वाचा: जहांगीरपुरी : "द्वेषाचे बुलडोझर बंद करा"; राहुल गांधीचा केंद्रावर निशाणा
अचलपूरमध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता त्यामुळं तिथं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्यावतीनं निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी माजी कृषीमंत्री भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांनी या दंगलीमागे मास्टरमाईंड अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. काल युवक काँग्रेसकडून त्यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. यानंतर काँग्रेसचे नेते हरिभाऊ मोहोळ यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की, "बोंडे यांचं विधान जातीय तेढ निर्माण करणार असून त्यांना तातडीनं अटक करण्यात यावी" या तक्रारीनंतर पोलिसांनी जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी १५३ 'अ' अंतर्गत बोडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळं अनिल बोंडे यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
अनिल बोंडे काय म्हणाले होते?
दुर्देव आहे की या दंगलीबाबत अभय म्हात्रे मास्टरमाईंड असल्याच्या बातम्या आल्या. पण म्हात्रे हा मास्टरमाईंड नाही तर या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहेत, त्यामुळं तेच याचे मास्टरमाईंड आहेत. कारण अमरावतीत १२ नोव्हेंबरमध्ये ४०,००० मुस्लिमांनी दंगल घडवून आणली. त्यानंतर अचलपूरमध्ये काश्मीर फाईल पाहून आलेल्या मातंग समाजातील मुलांनी भारत माता की जय म्हटलं म्हणून हल्ला झाला. म्हणून अमरावतीत होत असलेल्या दंगलींना एकमेव काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याचं जबाबदार आहेत.
Web Title: Making A Statement That Creates Ethnic Rift Fir Filed Against Anil Bonde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..