
Malegaon Blast: मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनी आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुंबईतील एनआयए विशेष न्यायालय आज निकाल सुनावू शकते. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी व्यतिरिक्त, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह ७ आरोपी आहेत, ज्यांच्यावर दहशतवादी कट रचणे, खून करणे, धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप आहेत.