Ex-ATS officer claims there were secret orders to arrest RSS chief Mohan Bhagwat in the Malegaon blast case : २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील (ATS) माजी पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी खळबळजनक दावा केला आहे. मालेगाव प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश मिळाले होते, असं ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.