Supriya Sule : दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली

दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणून त्यांना संपवायता आहे.
mp Supriya Sule
mp Supriya Sulesakal

माळेगाव - दिल्लीमधील अदृष्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे. मराठी माणून त्यांना संपवायता आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पुर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पुर्णतः विरोधाभास जानवतो. अत्ताचे भाजपवाले जुमलाबाज आहेत. त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणूकीत जनता नाकारणार आहे.

त्यामुळेच दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करतात. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. परंतु आम्ही इंडियावाले या भाजपवाल्यांविरुद्ध लढणार आणि जिंकरणारही आहे, असा निर्धार खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये व्यक्त केला.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी झाली, आदी विषयांच्या पार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे यांनी माळेगाव (ता. बारामती) येथे पत्रकारांशी संवाद साधला. सुनावणी होण्याआगोदरच आम्हाला चिन्ह व पक्ष मिळणार असे आमच्यातून निघून गेलेले नेतेमंडळी बोलून दाखवितात.

त्यामुळेच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे सुप्रिम कार्टात आमच्यातून बाजूला गेलेल्यांविरुद्ध अपिल केले, या भूमिकेकडे लक्ष वेधत सुळे म्हणाल्या, ` भाजपची रणनिती संविधान टिकण्याच्यादृष्टीने धोकादायक आहे. भाजपचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात एक अशी भूमिका घेत असल्यामुळे मराठा, धनगर, अन्य जातीमधील अरक्षणाचे मुद्दे मागे राहिले.

महिला विधायक मंजूर करून महिलांना बेरर चेक दाखविला खरा, परंतु त्या चेकवर दिनांक टाकली नाही. त्यामुळे दिल्ली वगळता देशात कोठेही महिलांकडून या मंजूर विधायकाबाबत स्वागत अथवा जल्लोश झाला नाही.` महाराष्ट्रात भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते, परंतु या महिलांना सध्याला मोठ्या राजकिय आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे, असे विचारले असता सुळे म्हणाल्या,` मुख्यमंत्रीपद हे महिला अथवा पुरूषांमध्ये कृतृत्वान माणसाला मिळते.

हे जरी खरे असले तरी महिला म्हणून मी, मुंडेताई आपापल्या पक्षामध्ये खंबीरपणे काम करीत आहे. परंतु आम्हाला स्वतःच्या पक्षातूनच संघर्षाला सामोरे जावे लागते, हे दुर्दैवी आहे.` कोवीड काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकाने लोकांचे आरोग्य सुरक्षिते ठेवण्यासाठी उत्तम काम केल्याचे देशातील जनताच बोलून दाखवते, असे सांगून सौ. सुळे म्हणाल्या,` महाराष्ट्रामध्ये नांदेड, नागपूर, ठाणे, संभाजीनगर आदी ठिकाणी सरकारी हाॅस्पीटलमध्ये सुविधांचा अभाव, कामातील हालगर्जीपणा आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने मोठी मनुष्यहानी झाली आहे. कच्चीबच्चीमुले डोळ्यादेखत मरण पावली. तेथील मातापालकांचे हाल पहावत नव्हते. याचा जाब सरकारला आगामी काळात द्यावा लागणार आहे.`

बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणार...

आपले बंधू अजितदादा आपल्याबरोबर नसल्याने बारामती लोकसभेची निवडणूक आव्हानात्मक आहे असे सौ. सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, `बारामती लोकसभा मतदार संघात गेली १५ वर्षे प्रमाणिक काम केले. या मतदार संघाने मला संसदेमध्ये पाठविल्य़ानंतर इतके चांगले काम केले, की मला त्या संसदेने अनेकदा पुरस्काराने सन्मानिक केले. आजवर या मतदार संघात प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन आणि प्रोटोकाल धरून काम केले.

त्यामुळे लोकांमध्ये माझे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. या मतदार संघातील शाळा, आरोग्य सुविधा, रस्ते, दिवाबत्तीची सुविधा, मंदीरांचा जिर्णोधार, आदी काम मार्गी लावली आहेत. यापुढील काळात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुराव करणार आहे. या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारही, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.

अमोल मिटकरेंना फटकारले...

अजित पवार यांच्यासारख्या भावाने तण, मन आणि धण दिल्यामुळे सुप्रियाताई तुम्ही राजकारणात यशस्वी झालात, असे आमदार अमोल मिटकरे यांनी वक्तव्य केले होते, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता सौ. सुळे म्हणाल्या, `राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तण आणि मनाने निवडणूका लढवते आणि जिंकते. राहिला प्रश्न धणाचा. धण कोणाला दिले, हे पुन्हा एकदा त्यांनी विचार करून सांगावे. धणाने निवडणूका जिंकण्याची आणि सरकार पाडण्याची संस्कृती आमची नाही, तर तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला त्यांची आहे.` अशा शब्दात त्यांनी मिटकरेंना फटकारले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com