'मविआ'ला पुन्हा झटका, मलिक देशमुखांची याचिका फेटाळली

nawab malik , anil deshmukh
nawab malik , anil deshmukhesakal

विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, सुप्रिम कोर्टाने महविकासआघाडील पुन्हा धक्का देत मलिक देशमुख यांची याचिका फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना सुप्रीम कोर्टाने सुनावणीवर निकाल जाहिर केला.

सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही इतक्या उशिरा न्यायालयात का आला? असा सवाल उपस्थित केला आहे.

nawab malik , anil deshmukh
Vidhan Parishad Election Live: दुपारी 2 वाजेपर्यंत 275 जणांचं मतदान, अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोघांना मतदान करण्यासाठी न्यायालय परवानगी देणार का, याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, तुम्ही इतक्या उशिरा न्यायालयात का आला? तुम्हाला समजा परवानगी दिली तर तुम्ही मतदान करू शकाल का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. त्यावर तुम्ही आदेश दिला तर आम्ही मतदानाची व्यवस्था करू असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायमूर्तींनी लवकरच निकाल देणार असल्याचे सांगितले.

nawab malik , anil deshmukh
MLC Election 2022 | भाजपची नवी खेळी, बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला

विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून या दोन्ही नेत्यांच्यावतीने राष्ट्रवादीने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचे अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com