कंधार तालुक्यात कुपाेषित बालकांच्या संख्येत वाढ; अधिकाऱ्याविना चालते कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालय कंधारच्या अंतर्गत कंधार तालुक्यातील ग्रामीण भागात ३२० अंगणवाडीचा कारभार पाहिल्या जाताे. मात्र, या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा पदभार माहूरच्या विस्तार अधिकाऱ्याकडे असल्याने येथील कार्यालय अधिकाऱ्याविना चालत आहे

कंधार: एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालय कंधारच्या अंतर्गत कंधार तालुक्यातील ग्रामीण भागात ३२० अंगणवाडीचा कारभार पाहिल्या जाताे. मात्र, या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचा पदभार माहूरच्या विस्तार अधिकाऱ्याकडे असल्याने येथील कार्यालय अधिकाऱ्याविना चालत आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळाेवेळी दुर्लक्ष हाेत असल्याने याचा परिणाम कुपाेषित बालकावर हाेत असल्याने दिवसेंदिवस कंधार तालुक्यात कुपाेषित बालकांच्या संख्येत वाढ हाेत आहे.

कंधार तालुक्यात ३२० अंगणवाडीपैकी माेठ्या अंगणवाडी २४०, तर मिनी अंगणवाडी ८० आहेत. त्यावर कार्यकर्त्या म्हणून ३१५, तर मदतनीस म्हणून २६५ कार्यरत आहेत. ८१ महिला बचत गटामार्फत १२५ अंगणवाड्यांना आहार पुरविला जाताे. या अंगणवाड्यातील शून्य ते सहा वयाेगटातील बालकांना शासन सक्षम, निराेगी हाेण्यासाठी आराेग्य तपासणी, औषधी पुरवठा, लसीकरण, पाेषण आहार, त्याचबराेबर पूर्वप्राथमिक शिक्षणाची साेय उपलब्ध करून काेट्यवधी रुपयांचा खर्च केला जाताे. शासनाच्या वतीने कुपाेषणमुक्तीसाठी अनेक पावले उचलली. लाेकसहभाग वाढवला, तीव्र कमी वजनाच्या बालकांना महाराष्ट्र स्टेट काॅपरेटिव्ह कंपनी फेडरेशनकडून आहार पुरवठा करून त्यात शेंगदाणे, राजगिरा लाडू, मुरमुरे, दही - धपाटा, गाेड भात, उसळ, खिचडी आदींसह सकस आहार दिला जाताे.

येथील बालप्रकल्प अधिकारी कार्यालयात राहत नाही. त्यामुळे कर्मचारी व अंगणवाडीही सुरळीत चालत नाही. माहूरच्या पंचायत समिती कार्यालयाच्या विस्तार अधिकारी ३०० किलाेमीटर अंतरावर येथील कारभार पाहतात. ना इधर ना उधर अशीच अवस्था या विस्तार अधिकाऱ्याची झाली. त्याच्या मनमानी कारभाराला येथील कर्मचारी व अंगणवाडी कर्मचारीही कंटाळले आहेत, तर अनेकदा कुपाेषित बालकाने वजन वाढून टाका म्हणून कर्मचाऱ्यांना सक्ती केल्याची कर्मचाऱ्यांकडून दबक्या आवाजात बाेलत हाेते.

तालुक्यात २१ हजार बालके अंगणवाडी प्रवेश घेतला आहे. पण अंगणवाडी व कुपाेषित बालकांच्या उपाययाेजनांसाठी अधिकारी वेळाेवेळी मिळत नसल्याने दाेन हजारांवर कुपाेषित बालकांची संख्या पाेचली आहे. त्यात सर्वसाधारण, तीव्र कुपाेषित, वजन कमी असलेली बालकांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. कंधार तालुक्यात अंगणवाडीचा भाेंगळ कारभाराच्या तक्रारी कंधार पंचायत समितीच्या सभापती सदस्यांना मिळाल्या. त्यांनी भेटी दिल्या असता या अंगणवाडीत कर्मचारी नाही, तर बालके पण कमी हाेते. येथील कर्मचारी तालुक्यावर साहेबांना भेटण्यास जातात, साहेब भेटत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तक्रारी स्पष्ट झाल्या. यामुळे तालुक्यात कुपाेषित बालकांच्या संख्यत वाढच हाेत आहे, ही दुर्देवी बाब समाेर आली आहे.

Web Title: mallnutration in kandhar district esakal news