esakal | युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी मानस पगार यांची नेमणूक; काय आहे सुपर 1000 अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

Manas Pagar appointed as head of Youth Congress Super 1000 campaign

विधानसभा 2019 च्या वेळेस राबवलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान (सुपर 1000) अभियान राबवण्यात येणार असून या अभियानासाठी सरचिटणीस मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयक म्हणून तर विक्रम ठाकरे, राहुल येवले, अश्विनी आहेर, मधूकर नाईक, नितीन पाटील, ऋषीकेश पाटील यांच्याकडे समन्वयक म्हणून जबादारी देण्यात आली आहे. काँग्रेसचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे समजते.

युवक काँग्रेसच्या सुपर 1000 मुख्यपदी मानस पगार यांची नेमणूक; काय आहे सुपर 1000 अभियान

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी साठी नुकत्याच पदोन्नती तसेच नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यावेळी युवा जोडो अभियानच्या (सुपर 1000) मुख्यपदी मानस पगार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

काय आहे सुपर 1000 अभियान?
विधानसभा 2019 च्या वेळेस राबवलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान (सुपर 1000) अभियान राबवण्यात येणार असून या अभियानासाठी सरचिटणीस मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयक म्हणून तर विक्रम ठाकरे, राहुल येवले, अश्विनी आहेर, मधूकर नाईक, नितीन पाटील, ऋषीकेश पाटील यांच्याकडे समन्वयक म्हणून जबादारी देण्यात आली आहे. काँग्रेसचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे समजते.

युवक काँग्रेसच्या आणखी काही नियुक्त्या
युवक काँग्रेेसने आणखी काही नियुक्त्या केल्या असून शिवराज मोरे, ब्रिजकिशोर दत्त यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. आमदार ऋतुराज पाटील, मधुकर नाईक, प्रेरणा वरपूडकर, नीरज लोणारे, निखिल कवीश्वर, निखिल कांबळे, सोनलक्ष्मी घाग, अश्विनी आहेर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रवीण बिराजदार, अक्षय जैन, योगेश महाजन, स्नेहा पाटील, विवेक गावंडे, कौस्तुभ नवले, अक्षय भोयर, डॉ. वैष्णवी किराड, राम डहाके, गायत्री सेन, राहुल माणिक, यशवर्धन ठाकूर, डॉ. मेघा सावसाकडे, असिफ शेख, सागर चव्हाण, नितीन सरनाईक, यग्ज्ञवल्क्य जिचकर, शिल्पा कांबळे, जिया शेख, संतोष जाधव, सचिन लांडे, वसीम श्वख, अनघा पावले, रौनक चौधरी, निखिल डवळे, अफजल शहा, गौरवी पानसरे, रोसेपिला डिसुझा, प्राजक्ता कामलिनी, अनुश्री हिरादिवे, मोहम्मद अन्सारी, आयेशा खान, आनंद कुमार दुबे यांची चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.करीना शेरॉन झेवियर, प्रिया पवार, विश्वजित हाप्पे, इरशाद शेख, सागर कावरे, जयदीप शिंदे, कल्याणी रांगोळे, कल्याणी मानगावे राहुल येवले या पदाधिकाऱ्यांना सरचिटणीस पदी बढती देण्यात आली आहे. 
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------
विधी व न्याय विभागासाठी करीना शेरॉन झेवियर यांच्याकडे मुख्य समन्वयक तर अमरीश भोईकल्पेश पाटील, विवेक गावंडे, झिया शेख समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. युवती कांग्रेसच्या मुख्य समन्वयक म्हणून प्रिया पवार यांना तर समन्वयक म्हणून नेहा निकोसे, मंजुषा कसबे, कल्याणी रांगोळे, शिल्पा कांबळे, अनघा पावले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मीडिया विभागात प्रवक्ता व समन्वयक म्हणून रीषीका रांका यांच्याकडे कोकण, कल्याणी माणगावे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र , बालाजी गाडे यांच्याकडे पुणे, कपिल ढोके यांच्याकडे विदर्भ, आनंद सिंग आणि लटोया फर्न्स यांच्याकडे मुंबई, दर्शन पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र तर निलेश अंबावडेकर यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रिसर्च विभागात मूळचे समन्वयक म्हणून यग्ज्ञवल्क्य जिचकर तर समन्वयक म्हणून गौरव पानसरे, सौंविध जाधव आनंदकुमार दुबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

नवीन नियुक्ती देण्यात आलेल्या तसेच पदोन्नती देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.