
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान उपोषणाआधी त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना आणि सरकारलाही महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले की मराठा बांधवांना सरकारने सहकार्य केले आहे, त्यामुळे आता आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे. सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मी आरक्षण मिळाल्याशिवाय इथून हटणार नाही, मराठ्यांचा विजयाच गुलाल उधळल्याशिवाय मी आझाद मैदान सोडणार नाही अशी घोषणा जरांगेंनी केली.