
Summary
मनोज जरांगे मुंबई मोर्चासाठी निघाले असून त्यांनी हिंदू सणासुदीच्या नावाखाली मराठा समाजावर अडथळे घालण्याचा आरोप केला.
त्यांनी मोदी-शहा यांना थेट प्रश्न विचारत सरकारवर हिंदूविरोधी वर्तनाचा आरोप केला आणि शांततेत लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा देत, समाजाला आत्महत्या न करण्याचे आवाहन केले.
Maratha Mumbai March : मनोज जरांगे मुंबईच्या मोर्चावर ठाम असून आज सकाळी दहा वाजता आंतरवालीतून हजारो मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत. सकाळी त्यांनी गणपतीची आरती केली. यांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की चूक झाकण्यासाठी देवदेवतांना पुढे करुन मराठ्यांच्या गरीब पोरांची अडवणूक केली जात आहे. पण आम्हीही हिंदू आहोत, त्यामुळे सण-उत्सवाला गालबोट लागणार असे कोणतेही कृत्य करणार नाही. न्यायालय आम्हाला न्याय देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.