

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मोर्च्याच्या आयोजनासाठी बैठक घेतली. या इशारा बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बीडमधील इशारा बैठकीवेळी डीजेवर गाणी लावण्यास बंदी घातली होती. यावरून मनोज जरांगे पाटील थेट सरकारवर कडाडले. फडणवीसांनी पोलिसांना चिल्लर चाळे करायला लावले. पण लक्षात ठेवा आज सत्ता आहे, उद्या नसेल अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला.