
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत मोर्चा नेण्याचा निर्धार केलाय. यासाठी बीडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीच्या ठिकाणी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा दिली. यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय परतायचंच नाही. आरक्षण डोक्यावर घेऊन गुलाल उधळूनच परत यायचं अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून मुंबईला यायचं थांबू नका असं आवाहनही स्थानिक नेत्यांना जरांगेनी केला.
मंत्री फी भरणार नाही, लेकराबाळांचं शिक्षण होणार नाही. तुमची सत्ता आली म्हणून फुकट नोकऱ्या नाही लागणार. इथं जातीवर संकट आलंय तर तुम्हाला रक्षण करावं लागेल. सरकार मराठ्यांवर संकट आणतेय पण आता मराठा लढणार आहे असंही जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं.