Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी पाटलांना सुरक्षित ठिकाणी हलवले

Manoj Jarange : कुणबी नोंदीबाबत पुढील दिशा आणि अडचणींबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. आंतरवलीमधील एका शेतात ही बैठक सुरु असतानाचा मधमाशांनी हल्ला केला. यामुळे कार्यकर्त्यांची पळापळ झाली.
"Antarwali Sarati meeting disrupted as bees attacked; Manoj Jarange Patil was safely escorted under a cloth covering."

"Antarwali Sarati meeting disrupted as bees attacked; Manoj Jarange Patil was safely escorted under a cloth covering."

esakal

Updated on

Summary

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला झाला आणि गोंधळ निर्माण झाला.

कार्यकर्ते पळापळ करू लागले, तर समन्वयकांनी जरांगे पाटील यांना उपरण्याने झाकून सुरक्षित ठिकाणी नेले.

परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर बैठक पुन्हा सुरु झाली आणि आरक्षण आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली.

मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. दरम्यान बैठक सुरु असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळ बैठक थांबवण्यात आली. मनोज जरांगेच्या अंगावर उपरणे टाकून तेथून दुसरीकडे नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com