मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधव मुंबईत आंदोलन करणार आहेत. २९ ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी मनोज जरांगे रवाना झालेत. मराठा आरक्षण ओबीसीतूनच द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. आंदोलनात कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही. पण आम्हाला कोणतीही अट घालू नका अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय. एक दिवसासाठी नव्हे तर कायमच्या आंदोलनाची परवानगी द्या असंही ते म्हणाले. जर परवानगी मिळाली नाही तर टप्प्याटप्प्याने आंदोलन कसं करायचं हे ठरल्याचंही जरांगे पाटील म्हणालेत. मराठ्यांनी थोडं संयमाने घ्यावं असं जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केलंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबत पोलिसांना हमीपत्र दिलं आहे. त्यात २० आश्वासनं देण्यात आली आहेत.