
Manoj Jarange Patil Protest : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचे उपोषण पाचव्या दिवशीही तीव्र स्वरूपात सुरू आहे. यावेळी त्यांनी हैदराबाद गॅझेट, सातारा आणि बाँबे गॅझेटियर लागू करण्याची मागणी लावून धरली आहे. विशेषतः हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवर त्यांचा विशेष भर आहे. पण हे हैदराबाद गॅझेट नेमके आहे तरी काय आणि मराठा आरक्षणासाठी त्याचे महत्त्व काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.