Manoj Jarange on SIT Inquiry: आंदोलनाच्या एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया म्हणाले, 'जर मी खरा असेल तर...'

Manoj Jarange on SIT Inquiry: मनोज जरांगे यांनी एसआयटी चौकशीचं स्वागत केलं आहे. पण, ही चौकशी एकतर्फी न करता सर्व नेत्यांची देखील करावी असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
Manoj Jarange on SIT Inquiry
Manoj Jarange on SIT InquiryEsakal

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी एसआयटी चौकशीचं स्वागत केलं आहे. पण, ही चौकशी एकतर्फी न करता सर्व नेत्यांची देखील करावी असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

एसआयटी चौकशीमध्ये जर माझं सगळं खरं निघालं तर एसआयटीला मात्र, देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावं लागेलं असंही पुढे जरांगे यांनी म्हटलं आहे.

यत्रंणा मात्र, घटनेला आणि कायद्याला धरून वापरा, तुम्ही निष्पक्षपातीपणे लढा. पण, मी खरा असेल तर ज्याने एसआयटी चौकशी लावली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल. कारण मला माहिती आहे. मी पळपुटा नाही, एसआयटी चौकशीसमोर मी सगळं सांगतो, असं मनोज जरांगे म्हणालेत.

Manoj Jarange on SIT Inquiry
Manoj Jarange Narco Test: मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूचे आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

शेलार म्हणाले, "महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कोणी ठरवलं? ही केवळ धमकी आहे का? या मागची भूमिका काय? यामध्ये संशय आहे का? यात कोणी कट-कारस्थानं केली आहेत का? असे अनेक सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केले तसेच कोर्टानंही तुम्ही गांभीर्यानं घ्या. त्यामुळं शांत बसू नका, अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडं केली आहे. जरांगेंच्या भूमिकेमुळं मराठा समाजाची बदनामी होत असल्याचंही ते म्हणाले" 

Manoj Jarange on SIT Inquiry
Devendra Fadnavis: जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण? देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com