
Manoj Jarange addressing Dussehra rally at Narayangad, questioning opponents over Nizam Gazette and 1931 Census reservation issue.
esakal
Summary
विरोधकांना मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अपमान न करण्याचा इशारा दिला.
मराठे भीत नाहीत, सरळ करायला ताकद आहे, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
जे मराठ्यांविरोधात उभे राहतील त्यांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं.
आम्हाला निझामाच्या गुलामीचे गॅझेट स्वीकारले म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या १९३१ सालच्या जनगणनेनुसारच आरक्षण घेतले आहे, मग तुम्ही कोण? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. त्यांनी नारायणगडावर दसरा मेळाव्यात हैद्राबाद गॅझेटवरुन विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोक आम्ही गुलामीचे गॅझेट स्वीकारले असे काही लोक म्हणत आहेत मग तुमच्या घरात काय इंग्रज राहात होते का असं आम्ही म्हणायचं का? असा सवाल त्यांनी केला.