मुंबई भाजप अध्यक्षपदी गुजराथी चेहरा

Manoj Kotak
Manoj Kotak

मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे.

कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना डावलण्यात आले. शेलार यांचे गेल्या काही दिवसांपासून श्रेष्ठींशी संबंध ताणलेले होते.

आशीष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यापूर्वीच त्यांच्याजागी कोटक यांची नियुक्ती करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपने लोकसभा निवडणुकीत कोटक यांना संधी दिली होती. कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव करून खासदारपद मिळविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com