माओवादी नेत्यांनी पुरविला कबीर कला मंचला निधी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - समाजात अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करण्यासाठी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या नेत्यांनी कबीर कला मंचला सुमारे 12 लाख रुपयांचा निधी पुरविला होता. त्यातूनच एल्गार परिषद झाली, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, युवकांना भडकविण्यासाठी अखिल भारतीय युनायटेड फ्रंट नावाची संघटना स्थापन करून, त्याद्वारे माओवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा त्यांचा डाव होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. 

शहर पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता. 28) देशातील दिल्ली, रांची, मुंबई, ठाणे, फरीदाबाद, हैदराबाद आदी नऊ शहरांत छापे टाकून पाच जणांना अटक केली आहे. माओवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यामुळे त्यांनी अखिल भारतीय युनायटेड फ्रंट नावाची संघटना स्थापन करण्याचे ठरविले. त्यासाठीची जबाबदारी माओवादी संघटनेच्या इस्टर्न रिजनल ब्यूरोकडे सोपविण्यात आली होती. त्या ब्यूरोने कबीर कला मंचला एल्गार परिषदेपूर्वी 12 लाख रुपये सोपविले. त्यातूनच एल्गार परिषद झाली, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

शस्त्रे जमविणे, समाजात अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करणे, प्रस्थापित राजकीय व्यवस्था उलथवून टाकणे, युवकांना भडकविणे या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी निधी पुरविण्यात आला आहे. त्यातूनच एल्गार परिषदेनंतर हिंसाचार घडला, असे पोलिसांनी सांगितले. देशात बंदी घालण्यात आलेल्या अन्य काही संघटनांशीही माओवादी नेत्यांचा याबाबत संपर्क असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. काश्‍मीरमधील काही फुटीरतावादी संघटनांचाही त्यात समावेश आहे, असेही वरिष्ठ पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राष्ट्रवादी मानवाधिकार आयोगाची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: Maoist leaders have provided funding to Kabir Kala Manch