Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले. उपोषणकर्त्यांचे बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. 

राज्यभरातून आलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर दोन नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. प्रकृती ढासळल्याने काही उपोषणकर्त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही; उलट त्यांच्यावर उपोषण सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप अन्य आंदोलकांनी केला. हे उपोषण आज ११ व्या दिवशीही सुरूच होते. 

संभाजी पाटील, विपुल माने, निशांत सपकाळ, विलास सुद्रिक, केदार जाधव, नवनाथ पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपोषण करत आहेत. यापूर्वीही काही आंदोलकांना रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र आता आम्ही रुग्णालयात जाणार नाही. जे काही करायचे ते उपोषणाच्या मंडपातच करा, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Maratha Kranti Morcha Agitation Maratha Reservation