#MarathaKrantiMorcha औरंगाबादेत विष प्राशन केलेल्या आंदोलकाचा मृत्यू

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : देवगाव रंगारी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या रास्ताको आंदोलनात मंगळवारी (ता 24) दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातील एकाचा उपचारदारम्यान घाटीत मृत्यू झाला. जगन्नाथ सोनवणे असे मृताचे नाव आहे.

वेळगंगा नदीच्या पुलावरून जयेंद्र सोनवणे या 30 वर्षीय युवकाने उडी मारली होती. दरम्यान जवळच असलेल्या शेतात जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (वय 50) यांनी विष प्राशन केले होते. या दोन्ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडल्या होत्या. दोघांना 108 रुग्णवाहिकेने घाटीत दाखल करण्यात आले होते. जयेंद्र यांच्या डाव्या पायाला एक फॅक्चर असल्याने त्यांच्यावर घाटीच्या लिथोट्रिप्सी वार्डात उपचार सुरू आहे.

जगन्नाथ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर मेडिसिन विभागातील एमआयसीयुत उपचार सुरू होते. विष डायल्युटेड नसल्याने शरीरात तात्काळ पसरल्याने रात्री अडीच वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजता उत्तरीय तपासणी नंतर जगन्नाथ यांचे पार्थिव देवगाव रंगारी येथे दहा वाजता रवाना करण्यात आले.

देवगांव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांना दोन एकर शेती आहे त्यांच्या लहान मुलगा भगवान सोबत ते शेती करतात.तर मोठा मुलगा भारत हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात तलाठी आहे. मराठा आरक्षणासाठी वडिलांचा जीव गेल्याचे भगवान सकाळशी बोलताना म्हणाला.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, समाजाचा संयम संपला असून, आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, यासह काकासाहेबांशी संबंधित काही मागण्या करीत समन्वयकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान आज (ता. 25) मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, तसेच साताऱ्यात बंदचे आवाहन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com