सोलापूर- आरक्षणासह इतर मागण्या पूर्ण केल्या आणि 72 हजार सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्थगिती दिली. तर, मुख्यमंत्र्याना वाजवत गाजवत पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेसाठी आणू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चान व्यक्त केली आहे.
याशिवाय, मराठा समाजाचे आंदोलन अजून स्थगित झालेलं नसून यापुढे हा लढा प्रखर आणि तीव्र करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. पंढरपूरला महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना न येण्याची सुबुद्धी मिळाली तशी सुबुद्धी पांडुरंगाने मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घरी बसून विठ्ठलाची पूजा करावी आमची काही हरकत नाही, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो. पण मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आज फक्त ट्रेलरच दाखवलाय उद्या राज्यभरातला मराठा समाज पिक्चर दाखवून घरी बसवेल असा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.