मराठा ठोक मोर्चा युतीच्या विरोधात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा शिवसेना-भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मोर्चाचे समन्वयक संजय जाधव यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचाल निश्‍चित करण्यासाठी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात येऊन आम्हाला अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्यांनी ‘मातोश्री’वर गेलेल्या शिष्टमंडळाचा अपमान केला. राज्य सरकारनेही आरक्षण देण्याचे जाहीर करून अद्याप आरक्षण लागू केले नसल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना गावबंदी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याची घोषणा जाधव यांनी केली. आरक्षणाच्या मागणीवरून झालेल्या जाळपोळीच्या घटना सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये सामावून घेऊ नका, असा जीआर काढला; त्यांना उद्धव यांनी विरोध का केला नाही. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द काढले; त्याचाही आम्ही निषेध करत असल्याचे जाधव यांनी जाहीर केले. सरकारने मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण जाहीर केले. मात्र, ते अजून लागू झालेले नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा येत्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा समन्वयक अण्णासाहेब जावळे-पाटील यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha morcha Against the Alliance