sambhaji raje
sambhaji rajesakal

संभाजीराजेंच्या पाठीशी मराठा संघटना एकवटल्या; राज्यसभेच्या जागेचा तिढा सुटणार?

राज्यसभेची सहावी जागा संभाजीराजेंना देण्याची मागणी

ठाणे - राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आता मराठा संघटनेने व्‍यूहरचना करण्‍यास सुरुवात केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून कोणत्याही अटी, शर्ती न ठेवता संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पण सहाव्या जागा शिवसेना लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभाजीराजेंना उमेदवारी हवी असल्यास ‘शिवबंधन’ बांधावे लागणार आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेतील मोठ्या नेत्यांशी मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान गाठले.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम

कोणत्‍याही अटी-शर्ती न ठेवता संभाजीराजेंना राज्यसभेची जागा द्यावी, अशी मागणी मराठा संघटनेच्‍या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मराठा समाजाच्या प्रश्नासाठी तसेच समाजातील अनेक विविध प्रश्नांसाठी त्यांना ही जागा द्यावी, असे या वेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहील, अशी प्रतिक्रिया दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com