esakal | केंद्रशासित दमण मध्ये घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रशासित दमण मध्ये घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर

केंद्रशासित दमण मध्ये घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर

sakal_logo
By
संदीप पंडीत

विरार : महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांचा (Marathi people) आवाज घुमू लागला कि उर अभिमानाने (proud) भरून येतो त्याच प्रमाणे काल दमण (daman) दिसू येथे जय भवानी जय शिवाजीचे नारे लागले आणि मराठा सेवा संघाचा (maratha seva sangha) 31 वा स्थापना दिवस मराठा सेवा संघ केंद्रे शासित दमण-दीव (Daman-Diu) संघातर्फे भीड भंजन महादेव मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हेही वाचा: मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक

यावेळी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये समाजातील 8 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. मराठा सेवा संघ ही आता संस्था नसून एक वटवृक्ष झाला आहे. एक मराठा - लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, अशा लोकप्रिय घोषणा मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला दिल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक इमारती बांधून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचे योग्य स्थान देण्यात आले.महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, वक्ते, समाजसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

केंद्रशासित प्रदेशात मराठी सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात आणि अशा उत्सवांना लोक उत्सवाचे स्वरूप देण्यात आले आहे. मराठा सेवा संघ दमण विभाग प्रदेशाध्यक्ष गणेश पाटील यांनी यावेळी सांगितले कि, या स्थापना दिवस सोहळ्यात मराठा सेवा संघाचे अधिकारी वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्त करण्यात आले, ज्यात जिजाऊ ब्रिगेड, राजश्री शाहू महाराज परिषद, उद्योग कक्ष, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, कक्ष प्रमुख ,अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. यांच्यामार्फत या ठिकाणी मराठा सेवा संघाचे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणत विस्तारायचे आहे.

हेही वाचा: BMC : जंबो कोविड केंद्रामध्ये मुलांसाठी क्यूबिकल्स वॉर्ड

यावेळी मराठा सेवा संघा तर्फे जे कार्यक्रम आणि सेवा उपक्रम केले गेले ते उपस्थित समाजाला डॉक्युमेंटरी द्वारे दाखवण्यात आले. त्याचबरोबर मराठा समाज कसा एकत्र येऊ शकतो आणि जास्तीत जास्त सामाजिक कार्य आणि विकास कसा करू शकतो यावर मार्गदन करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ कांडेकर, जिजाऊ ब्रिगेड, प्रदेशाध्यक्ष मंदाकिनी संतोष कराळे, संजय रोटे, राज्य कार्याध्यक्ष,शिवश्री राजेंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस मीडिया प्रमुख प्रशांत भिसे यांनी मनन्ट घेतली मराठा सेवा संघ दमण दीवचे प्रदेशाध्यक्ष गणेश पाटील यांनी आभार मानले.

loading image
go to top