Maratha Protest Samruddhi Expressway : मराठा समाज आंदोलन! समृद्धी महामार्ग रोखला, दोन्ही बाजूने आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या

Manoj Jarange hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाने समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे १५ मिनिटे ठप्प झाली.
Maratha Protest Samruddhi Expressway Manoj Jarange hunger strike

Maratha Protest Samruddhi Expressway Manoj Jarange hunger strike

esakal

Updated on

Samruddhi Mahamarg road blockade : (उमेश वाघमारे) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) अंतरवाली सराटी येथे भर उन्हात शेतात बाज टाकून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद उमटू लागले असून मराठा समाज बांधवांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com