Maratha Reservation: राज्यात १० टक्के मराठा आरक्षण लागू; दोन दिवसांपूर्वीच शासन राजपत्र प्रकाशित

Maratha Reservation: सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गात समावेश झालेल्या राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत १० टक्के आरक्षण लागू झाले आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

मुंबई: सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गात समावेश झालेल्या राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. विधी आणि न्याय विभागाने २६ फेब्रुवारीला यासंदर्भातील शासन राजपत्र प्रकाशित केले. त्यामुळे आता मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून आयोगामार्फत खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केले. आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार २० फेब्रुवारीला झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर केले.

Maratha Reservation
Maratha Reservation: ...तर मी राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपे असं का म्हणाले?; मराठा आंदोलनाच्या SIT चौकशीच्या आदेशानंतर दिली प्रतिक्रिया

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित केले आहे. यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित केली आहे.

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार! शासन निर्णयासह राजपत्र जारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com