Maratha Reservation : बदनापूरमध्ये 24 तासांपासून तरुण टॉवरवर; तहसीलदार अन् पोलिस घटनास्थळी

Maratha Reservation
Maratha Reservationesakal

बदनापूर : मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना झाल्याने विल्हाडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील मराठा तरुण निवृत्ती कान्हेरे हा शनिवारी (ता. 28) दुपारी चार वाजेपासून गावाच्या बाजूला असलेल्या उंच मोबाईल टॉवरच्या शेंड्यावर जाऊन बसला आहे. त्याने शनिवारची रात्रही टॉवरवर काढली. तसेच रविवारी (ता. २९) दुपारी चार वाजेपर्यंत त्याचे आंदोलन सुरूच आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी टॉवरच्या खाली येणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली आहे. हा तरुण टॉवरवरून "एक मराठा - लाख मराठा" अशा घोषणा देत असून खाली उभे राहणारे मराठा बांधव देखील त्याच्या घोषणेला जोरदार प्रतिसाद देत आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीच्या खासदाराने दिला राजीनामा; पत्रामध्ये काय म्हटलंय बघा

निवृत्ती कान्हेरे या तरुणाने टॉवरखाली येऊन चर्चा करावी, अशी गळ त्याला मराठा समन्वयक घालत आहेत. तर बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे, पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत, तलाठी शेख खालेद, श्रीमती सांगळे आणि ग्रामस्थ त्याची खाली उतरण्यासाठी सतत मनधरणी आणि आग्रही विनंती करीत आहेत. मात्र आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आपण खाली येणार नाही, अशी भूमिका रविवारी दुपारी चारपर्यंत घेतली होती. आपण मोबाईल टॉवरवर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: जरांगेंचा जीव अत्यंत महत्वाचा त्यांनी मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

दरम्यान, निवृत्ती कान्हेरेला टॉवरखाली उतरवण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. सांगळे, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, महसूल प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, यावेळी कारभारी म्हसलेकर म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत, त्यामध्ये त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यातच विल्हाडी येथील युवक निवृत्ती कान्हेरे दोन दिवसापासून टॉवरवर चढलेला आहे. यापुढे आरक्षणसाठी लढा देणाऱ्या लोकांचे काही बरे-वाईट झाले तर याला पूर्णत: सरकार जबाबदार राहील आणि यासाठी सरकारला परिणामही भोगावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com