Maratha Reservation: मराठा-कुणबी नोंदीत बीड जिल्हा अव्वलस्थानी; आढळल्या तब्बल इतक्या नोंदी

मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत १२,६०४ नोंदी
Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation Kunbi Modi Lipiesakal
Updated on

Maratha Kunbi: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभर व विशेषत: मराठवाड्यात आंदोलनाचा जोर कायम आहे. त्यामुळे शासन स्तरावरून मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांचा शासन पातळीवर शोध घेतला जात आहे. यात बीड जिल्हास्तरीय समितीला मराठवाड्यात सर्वाधिक ११,१२७ नोंदी आढळल्या आहेत. तर, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत १२,६०१ नोंदी आढळल्या आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बेमुदत उपोषण सुरु केल्यानंतर शासनाने मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा वेळ मागून मराठा- कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरमकुंडी येथे विनोद गायकवाड यांनी जीवन संपविले

तसेच, निजामकालीन दस्तऐवजांत तसेच जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमुना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा नोंदी आहेत. या नोंदींच्या तपासणीसाठी शासनाने जिल्हा स्तरांवर निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (होम), अधीक्षक भूमि अभिलेख, अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून या नोंदींची तपासणी केली जात आहे.

पाहणीत गुरुवार (ता. १६) अखेरपर्यंतच्या अहवालात मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११,१२७ मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या खालोखाल हिंगोली जिल्ह्यात ३४६४ तर, जालना जिल्ह्यात ३२५१, परभणी जिल्ह्यात २०४१, धाराशीव जिल्ह्यात १२१५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०६५, नांदेड जिल्ह्यात ८७८, तर लातूर जिल्ह्यात ६८३ नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातील उर्वरित आठ जिल्ह्यांतील नोंदीच्या संख्येच्या प्रमाणात एकट्या बीड जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात आढळल्या तब्बल 'इतक्या' कुणबी नोंदी; आतापर्यंत 19 लाख नोंदींची तपासणी

सर्वाधिक प्रमाणपत्रे धाराशिव जिल्ह्यात

शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटपही सुरु केले आहे. धाराशीव जिल्ह्यात सर्वाधिक ११४ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०४ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. बीड ४७, जालना १९, परभणी १७, हिंगोली १८, नांदेड २२ व लातूरला १९ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

गेवराई अव्वल; परळी शून्य

गेवराई तालुक्यात सर्वाधिक नोंदी आढळल्याचे अहवालातून समोर येत आहे. त्याखालोखाल बीडचा समावेश आहे. परळी तालुक्यात एकही नोंद आढळलेली नाही.

जिल्हास्तरीय समिती महसूली अभिलेखे, जन्म मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेखे, भूमि अभिलेखांची पाहणी करत आहे. आतापर्यंत साधारण २२ लाख दस्तऐवज तपासले आहेत. उर्दू व मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी भाषांतरकारांचीही मदत घेतली जात आहे.

— दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हाधिकारी, बीड

Maratha Reservation Kunbi Modi Lipi
Maharshtra News : राज्यात 20 जणांकडे पॅथॉलॉजीची ‘बोगस’ पदवी! मुक्त विद्यापीठाकडून पडताळणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com