कुटेंची भाजप एंट्री अन् मुंडेंची भाऊबीज, बीडच्या राजकारणात भाजपची तगडी फिल्डींग! नेमकं घडतंय काय?

politics of Beed-
politics of Beed-

Politics Of Beed: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग इतकी वाढली की त्यातून निघालेल्या ज्वालांतून शेकडो सुशिक्षित तरुणांच्या ‘कॅरेक्टर’वर क्राईमचा शिक्का बसला. याच निमित्ताने ओबीसींचा आरक्षण बचाओ हा एल्गाराचीही सुरुवात झाली. कुटे दाम्पत्याला ‘एंट्री’ देत भाजपनेही सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाऊबीजेच्या ओवाळणीत कृषीमंत्री धनंजय मुंडे बहीण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना कुठला मतदार संघ ‘भेट’ देणार हे पहावे लागेल. मात्र, या सामाजिक व राजकीय उलथापालथींमुळे जिल्ह्यातील दुष्काळाकडे सत्ताधाऱ्यांचा काणाडोळा होत आहे, हे तेवढेच खरे.

मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्ह्यातील समाजमन ढवळून निघाले आहे. मात्र, आंदोलनाला ज्वालांचा डागही लागला. अंतरवाली सराटीच्या लाठीहल्ल्यात प्रमाणेच इथली जाळपोळ राज्यात गाजली. या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनाच ‘ओबीसी - मराठा’ दरी निर्माण करण्याची संधीही मिळाली. यातून आता बॅनरची फाडाफाड होत असली तरी आपण  पिढ्यान पिढ्या एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहत असल्याचे, एकमेकांच्या सुखदु:खात सोबत राहिल्याचे, एकमेकांना मदत केल्याचे दोन्ही समाजांनी विसरु नये हे महत्वाचे. जिल्ह्याची सामाजिक रचना पाहता राजकीयदृष्ट्या दोन्ही घटक समप्रमाणात असल्याने बहुतांशी नेते ‘डिफेन्स’ खेळत आहेत. म्हणूनच आज शुक्रवारी अंबडला होणाऱ्या आरक्षण बचाओ एल्गार परिषदेबाबत पहिल्या फळीतील कोणीही नेत्यांनी जाहीर आवाहन केले नाही. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर आदींची फोटो सभेच्या बॅनरवर आहेत.

दरम्यान, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी या परिषदेच्या तयारीसाठी जिल्हाभरात नियोजनाची धुरा सांभाळली. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अनौपचारिक भेटीला मिळालेला प्रतिसाद पाहता आंदोलनाच्या निमित्ताने दाखल ६६ गुन्हे आणि जिवे मारण्याच्या प्रयत्नांच्या कलमांमुळे आरक्षण मागणीची धार कमी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. याच काळात राज्यभर नाव असलेल्या कुटे ग्रुपचा घटक असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेमधील ठेवींचा मुद्दाही समोर आला. मात्र, त्यातून महत्वाचे म्हणजे द कुटे ग्रुपमध्ये याच काळात साडेचार हजार कोटींची गुंतवणूक आणि त्यांची धावपळीत झालेली भाजप एंट्री हे मात्र आगामी राजकारणाच्या दृष्टीने मोठी घडामोड मानली जात आहे.

केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजपने कुटेंना अडचणीतून काढण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारही मिळवून दिला अन॒ ‘इडी’, ‘सिबीआय’, ‘इनकम टॅक्स’च्या माध्यमातून भाजपच्या मांडवातही घेतले. त्यामुळे त्यांचे समीकरण देखील राष्ट्रवादीप्रमाणेच (अजित पवार गट) झाले. अडचणही टळली, चांगला पक्षही मिळाला अन् भविष्यात भाजपला वाटले तर चांगली संधीही. या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी ‘आमच्या हाती तगडा मोहरा’ असल्याचा सूचक इशारा पंकजा मुंडे यांना दिला आहे.

मराठा चेहरा, सामाजिक काम, हजारो कोटींचा समूह असे भाजपला निवडणुकीत हवे ते अस्त्र मिळाले आहे. त्यांचा वापर नेमका होतो कसा, हे पहावे लागेल. कालच कृषीमंत्री धनंजय मुंडें व पंकजा मुंडेंची भाऊबीज झाली. पण, ओवाळणी काय मिळणार. नव्या समीकरणात पंकजा मुंडेंच्या परळी मतदार संघावरच टाच आली आहे. आपण लोकसभा लढणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितले आहे. तुम्ही नाही तर ‘कुटे’ आहेत हे भाजपने त्यांना एंट्री देऊन सांगून टाकले आहे. त्यामुळे आता या पेचातून मार्ग काढून की त्यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जुळवण्याची ओवाळणी धनंजय मुंडे देणार हे पहावे लागणार आहे.

politics of Beed-
Balasaheb Thackeray: बाळासाहेब गेले... उसळलेल्या गर्दीचं नियोजन नांगरे पाटलांनी कसं केलं?

भाजप विरोधानंतरही परळीतच ‘शासन’

नव्या राजकीय समीकरणानंतर जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादी वरचढ होत आहे. सहा महिन्यांपूर्वी बीडला होणारा सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तीन महिन्यांपूर्वी परळीत ठरला. भाजप आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन परळीत उपक्रम नको अशी मागणी केली. काही काळ लांबलेला हा उपक्रम परळीतच होणार आहे. या उपक्रमावर पालकमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचा वरचष्मा असेल.

दुष्काळाची होरपळ; विमा अग्रीमची मलमपट्टी नको

पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, बाजरी या पिकांचे उत्पादन घटले. सोयाबीनचा २५ टक्के अग्रीम मिळाला असला तरी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. संपूर्ण विमा मिळणे, दुष्काळाच्या संपूर्ण उपाय योजना होणे गरजेचे आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा २० टक्क्यांच्या आत आहे. विहिरी, विंधनविहीरी आजही कोरड्याठाक आहेत. आणखी चांगला पावसाळा यायला आठ महिन्यांचा काळ लोटायचा आहे. त्यामुळे जनावरांचा चारा-पाणी, पिण्याचे पाणी याच्या उपाययोजनांकडे नेत्यांनी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

politics of Beed-
Balasaheb Thackeray : जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना सोडली होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com