Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

Successful Resolution in Maratha Reservation Case : आंदोलनादरम्यान मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त करतो.
Maharashtra CM Devendra Fadnavis praises the cabinet subcommittee for its successful resolution in the Maratha reservation case.
Maharashtra CM Devendra Fadnavis praises the cabinet subcommittee for its successful resolution in the Maratha reservation case.sakal
Updated on

CM Devendra Fadnavis Praises Cabinet Subcommittee on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर आज संपलं आहे. या आंदोलनावर यशस्वीपणे तोडगा काढण्यात मंत्रिमंडळ उपसमितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समितीमधील सदस्यांचे विशेष कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनही तयारी होती. परंतु त्याती महत्त्वाचा विषय हा होता, की त्यातील मनोज जरांगे पाटील यांची अशी मागणी होती त्यात कायदेशीर अडचणी होत्या. उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बघता, अशा मागण्या सरसकट मान्य करणं हे शक्य नव्हतं.''

तसेच '' विशेषता आपण हे लक्षात घेतलं पाहीजे की, या संदर्भात ही वस्तूस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणू दिली गेली. मंत्रिमंडळ उपसमितीची जी काह टीम होती, त्यांनाही हे लक्षात आणू दिलं. की आपल्या कायद्यानुसार आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने त्यावर दावा करायचा असतो. म्हणूनच अशाप्रकारे ते सरकसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही.'' असंही फडणवीस म्हणाले.

Maharashtra CM Devendra Fadnavis praises the cabinet subcommittee for its successful resolution in the Maratha reservation case.
CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

याचबरोबर ''त्यांनीही काल ती भूमिका समजून घेतली. स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं कायद्यात जर सरकट बसत नसेल, तर सरसकट करू नका. त्यामुळे यातील मोठा अडसर दूर झाला आणि पुन्हा मग मंत्रिमंडळ समितीने चर्चा केल्या आणि जीआर काढला त्यात काही बदल आपण केले आणि तो अध्यादेशही काढला गेला आहे. यासोबत इतरही काही मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या आहेत.'' अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Maharashtra CM Devendra Fadnavis praises the cabinet subcommittee for its successful resolution in the Maratha reservation case.
Maratha Reservation and Satara Gazette : 'सातारा गॅझेट' म्हणजे नेमकं काय अन् मराठा आरक्षण आंदोलनात का आहे याला महत्त्व?

याशिवाय ''त्यामुळे सर्वप्रथम मला या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि या समितीमधील सर्व प्रमुख नेत्यांचं, आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायंच आहे की, त्यांनी सातत्याने बसून, मोठ्याप्रमाणात चर्चा करून हा मार्ग काढला आहे. हा मार्ग निघाल्याने मराठवाड्यत राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, त्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या सगळ्या दरम्यान मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त करतो. पण मला वाटतं की, शेवटी एक चांगला निर्णय आपण घेतला आहे.'' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com