Maratha Reservation and Satara Gazette : 'सातारा गॅझेट' म्हणजे नेमकं काय अन् मराठा आरक्षण आंदोलनात का आहे याला महत्त्व?

What is Satara Gazette? : सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीने १५ दिवसांचा कालावधी मागितलेला आहे, तर यावर जरांगेंनी...
Maratha Reservation
Maratha Reservation Sakal
Updated on

सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो आणि सातारा गॅझेटियर पुणे, औंध गॅझेटियरवरील नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत मनोज जरांगेंनी सरकारकडे मागणी केली होती. अखेर या गॅझेटियरच्य अंमलबजावणीस सरकारकडून सकारत्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मात्र काही किचकट गोष्टींमुळे यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने १५ दिवसांचा कालावधी मागितला आहे. ज्यावर जरांगेंनी महिनाभराची मूदत देतो असे म्हटले आहे.  सरकारने सांगितलंय की,, सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीरबाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल.

सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय? -

सातारा गॅझेट हा एकप्रकारे सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज आहे. ज्यात सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. याशिवाय, सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना, आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती देखील देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून सातारा गॅझेटमध्ये असू शकतात, ज्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून केला जातो.

Maratha Reservation
Manoj Jarange: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला मान्यता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

गॅझेट हे शासनाचे अधिकृत राजपत्र असते. हे गॅझेट स्थानिक स्तरावर जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खासकरुन वापरले जाते. सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केले जाते.

Maratha Reservation
Satara Gazetteer : ‘’आमच्यासाठी राजा बोलला विषय संपला’’ ; सातारा गॅझेटवर जरांगेंचं मोठं विधान!

याचबरोबर हैदराबाद गॅझेट हा निझाम काळातील अध्यादेश असून, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा-कुणबी नोंदींसाठी याचा उल्लेख अनेकदा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com