Maratha Reservation : आरक्षण टिकाऊ असले पाहिजे म्हणूनच विलंब होत आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळी भिडेवाड्याच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ajit pawar
ajit pawarsakal

पुणे - 'सरकारला नियमात व कायद्याच्या चौकटीत बसेल, त्याच गोष्टी कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नाही, देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून मांडलेले आरक्षण टिकले, मात्र ते उच्च न्यायालयात टिकले नाही.

म्हणूनच तिसऱ्यांदा आरक्षण देताना ते टिकाऊ असले पाहिजे, यावर सरकारचा भर आहे. म्हणूनच मराठा आरक्षण देण्यास विलंब लागत आहे.' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या "अल्टिमेटम'ला शनिवारी उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री पवार शनिवारी सकाळी भिडेवाड्याच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी राहिल्याचे जरांगे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, 'कोणी काय मागणी करावी, हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्‍न आहे.

यापूर्वी दोनदा आरक्षण देण्यात आले, ते टिकले नाही. त्यामुळे आता आरक्षण कायम टिकणारे असावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यास विलंब होत आहे. सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशीही चर्चा केली जात आहे.''

खासदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रश्‍नावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'अनेक खासदार काम करत असताना, नियम भंग झाला की कारवाई केली जाते. तिथे नेमके काय झाले, याबाबत मला माहिती नाही. विधानसभेत काही घडले असते, तर नक्की सांगितले असते. लोकशाहीतील उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री ही पदे महत्त्वाची असतात. तिथे काही घटना घडली असेल, त्यावरून कारवाई झाली आहे.'

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार दिला जाईल, असे सांगत पवार यांनी त्यावर सविस्तर बोलण्याचे टाळले. जिल्हा नियोजन समितीबाबत (डीपीडीसी)राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूत्र ठरविले आहे. तशाच प्रकारचे सूत्र ठरले असून त्यानुसार होईल. चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

...अजित पवार गट नव्हे, राष्ट्रवादीची बैठक झाली!

"शुक्रवारी अजित पवार गटाची नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली', असा पुनरुच्चार करीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस एक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच "आम्ही म्हणतोय तेच खरे, तुम्ही कोण ठरविणारे ? आम्ही कोर्टाचे बघू, आम्ही तिघे बसू, पक्षाबाबत निर्णय घेऊ, कुठलीही अडचण येणार नाही,' अशा शब्दात पवार यांनी पत्रकारांना धारेवर धरले.

...तर आमचे दौरे रद्द करून अमित शहांच्या भेटीला जाऊ!

राज्यसभा व लोकसभेचे कामकाज सुरू असल्याने गृहमंत्री अमित शहा यांची भेट होत नाही. अधिवेशन संपल्यानंतर ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलावणार आहेत, असे म्हणाले आहेत. पण त्यांनी अचानक निरोप दिला, तरी आमचे नियोजित दौरे रद्द करून शहा यांची भेट घेण्यासाठी जाऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच आम्ही सर्वधर्म समभाव मानणाऱ्यांपैकी आहे. आज सकाळी मी दगडूशेठ मंदिरात जाऊन आरती केली. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण मला अजून आलेले नाही. निमंत्रण आले तर जाण्याचा विचार करेल, असेही सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com