Maratha Reservation : आरक्षण मिळाले; जातीचा दाखला कसा काढावा?

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 28 जून 2019

मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला शिक्षणासाठी 12 तर नोकऱ्यांसाठी 13 टक्‍के आरक्षण न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्यांना, तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आता एसईबीसी (सामाजिक -आर्थिक मागास घटक) काढावे लागणार आहे. एसईबीसीसाठी आपापल्या तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सेतूमध्ये अर्ज करावा लागतो. राज्यभरातून याची माहिती घेतली जात आहे. 

औरंगाबाद : मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला शिक्षणासाठी 12 तर नोकऱ्यांसाठी 13 टक्‍के आरक्षण न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्यांना, तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी आता एसईबीसी (सामाजिक -आर्थिक मागास घटक) काढावे लागणार आहे. एसईबीसीसाठी आपापल्या तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सेतूमध्ये अर्ज करावा लागतो. राज्यभरातून याची माहिती घेतली जात आहे. 

एसईबीसी देण्याचा अधिकार हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला असून पहिले प्रमाणपत्र अंबड (जि. जालना) येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर 21 दिवसांत प्रमाणपत्र देण्याचा कालावधी आहे. 

एसईबीसी कुठे, कसे काढावे ? 

एसईबीसी कुठून काढावे : सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालये. 
-- 
या प्रमाणपत्रासाठी विहित नमुन्यातील अर्ज 
सज्ञान असल्यास अर्जदाराचे शपथपत्र, अज्ञान असल्यास अर्जदाराचे आई, वडिलांचे शपथपत्र, वंशावळी शपथपत्र 

अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र कमीत कमी 5 वर्षे 
तलाठी, मंडळ अधिकारी यांचा अहवाल. 
जवळच्या 5 रक्‍ताचे नातेवाईकांचे एकाच आडनावाचे शाळेतील प्रमाणपत्र (टी. सी.) 
अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मनोंद उतारा, किंवा शासकीय - निमशासकीय नोकरीत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा उतारा ई. जातीचा पुरावा. 

आजोबा, काका, चुलत भाऊ -बहीण यापैकी एकाची जात नमूद असणारा पुरावा. 

विवाहित महिलेसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास 

विवाहापूर्वीची जात सिद्ध करणारा एक पुरावा. (वडील, भाऊ शाळेतील प्रमाणपत्र). 
विवाह नोंदणी दाखला, राजपत्रात प्रसिद्ध झालेला नावातील बदल, लग्नपत्रिका, सरपंच- पोलिस पाटील यांच्यापैकी एकाचा दाखला. 

अर्जदार सक्षम अधिकाऱ्याचा कार्यक्षेत्रात 13 ऑक्‍टोबर 1967 पूर्वीपासून वास्तव्यात असल्याबाबतचा पुरावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation How to get the cast certificate