प्रशासन गाफील राहिल्यानेच शिंदेंची आत्महत्या : विनायक राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून घेत आत्महत्या केली होती. त्याच्या या मृत्यूनंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे.

- धनंजय महाडिक, खासदार

नवी दिल्ली : काकासाहेब दत्तात्रय शिंदे या मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केली होती. त्यांची आत्महत्या आणि आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी येथील जिल्हा प्रशासन, पोलिसांना पत्र लिहून याबाबतचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. तेथे तीन पोलिस उपस्थित होते. तरीदेखील यावर कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदे यांनी अखेर आपली जीवनयात्रा संपवली, असे राऊत यांनी सांगितले. 

तसेच कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी यावर सांगितले, की काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून घेत आत्महत्या केली होती. त्याच्या या मृत्यूनंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, अशी विनंतीही महाडिक यांनी यावेळी केली. 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जात आहे. या मोर्चाला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Maratha Reservation Issue Raised in Parliament