Manoj Jarange
esakal
महाराष्ट्र बातम्या
Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Demands Delay in Government Recruitment : मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देत कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण होईपर्यंत कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी केली असून दिवाळीनंतर आंदोलनाची घोषणा केली आहे.
Summary
कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया सुरू करू नका.
सरकारने पंधरा दिवसांचा कालावधी घ्यावा.
दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Maratha Reservation on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सरकारला कठोर इशारा दिला आहे. “कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) दिल्याशिवाय कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया सुरू केली जाऊ नये,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे.