Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणं योग्य नाही, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा

Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षणाचा आंदोलनाकडे राजकीयदृष्ट्या न बघता सर्वच राजकीय पक्षांनी चर्चेच्या माध्यमातून आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अन्य आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे विधान परिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चेत सहभाग घेताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावरून राज्यात काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत सरकारची भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आहे. पण कुणाचाही वाटा कमी करणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. मराठा आरक्षणावरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना दरेकर म्हणाले की, समाज मोठा नाही आणि बोलायला कोणीही नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला टार्गेट करणे योग्य नाही.


फडणवीस यांची मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका असतानाही सर्वच नेत्यांनी त्यांना खलनायक म्हणून सादर केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशीच भूमिका त्यांची सुरवातीपासूनच आहे. न्यायालयात टिकेल असेच आरक्षण देणार आहे. मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले की, यापूर्वीही मराठा समाजाचे ५७ मोर्चे निघाले होते. तिथे प्रचंड गर्दी होती. (Latest Marathi News)

त्याचे नेतृत्व कोणी केले नाही. हा जमाव त्यांचे प्रश्न घेऊन आला होता. ते समाजाच्या समस्यांबाबत होते. तरुणांमध्ये टॅलेंट असूनही ते शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मागे पडत असल्याचे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ही गर्दी जमत आहे. गर्दी माझ्यामुळे येत आहे, असा भ्रम कोणी करू नये असा टोला जरांगे यांचे नाव न घेता लावला.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा
Parliament Security Breach: संसदेतील घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेबाबत UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष करणार तपास

मराठा समाजाला आरक्षण नाही असे नाही. त्यांना इडब्ल्यूएस मधून ८ ते ८.५ टक्के आरक्षण मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठा फायदा झाला आहे. विविध प्रभागांमध्ये कसे फायदे देता येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या मार्गाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे दरेकर म्हणाले. सरकारने ओबीसींना दिलासा द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी शिवसेना सदस्य अनिल परब यांनी केली. याला कोणाचाही विरोध नाही, मात्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. शशिकांत शिंदे यांनी आरक्षण मिळाले पाहिजे असे मत मांडले. (Latest Marathi News)

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा
Old Pension Scheme : आरोग्य यंत्रणा सलाईनवर! राज्यातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com