

मुंबई- मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार असल्याचा आरोप काही विरोधक करत आहेत. यावर जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास दोन पाऊलं मागे जाण्यास तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सत्ताधाऱ्यांनीच हे आंदोलन बसवलं आहे असा आरोप होतोय. पण, सत्ताधारी कधी विरोधात आंदोलन उभं करु शकतात का? सर्वसामान्य मराठ्यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे. स्वत:ची भाकर खाऊन, दोन रुपये घेऊन ते आंदोलनाला येत असतात. स्व:ताच्या कुटुंबाला सोबत घेऊन मोठी ताकद उभी केली जात आहे. कोणाचा हात असेल तर सिद्ध करावा, मी दोन पाऊलं मागे जाईन, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाचं आंदोलन सरकारला झेपणार नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून शेवटपर्यंत हटणार नाही. माझी अंत्ययांत्रा निघेल किंवा मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल. त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील सर्वात मोठा आमचा समाज आहे. त्यापाठोपाठ धनगर समाज आहे. हे दोन समाज एकत्र आले तर सरकारला अवघड होईल, असंही जरांगे पाटील म्हणाले.
सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी समाज एकत्र आहे. आम्ही कधीही एकमेकांच्या विरोधात जाणार नाही. सरकारचा जो पर्यंत सुरु आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. समाजा-समाजात फूट पाडण्याचा राजकीय पक्षांचा डाव आहे, पण आम्ही तो कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्याला आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.