Baramati News : बारामतीत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा

बारामती शहरातील तीन हत्ती चौकामध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
Maratha Reservation Manoj Jarange-Patil
Maratha Reservation Manoj Jarange-Patilesakal
Updated on

बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (ता.20) बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

बारामती शहरातील तीन हत्ती चौकामध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजाच्या वतीने उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

Maratha Reservation Manoj Jarange-Patil
NMC News: N-CAP निधीतून त्र्यंबक रोड होणार मॉडेल! वाहतूक कोंडी टळणार

या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये त्यांचे सभा होत असल्याने या सभेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरात विविध सभा, आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता बारामती शहरात जरांगे पाटील येत असून त्यांची सभा होणार असल्यामुळे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com