
मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. २७ ऑगस्टला ते अंतरवाली सराटीतून निघाले. आज २८ ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. मध्यरात्री दोन वाजता जरांगेंच्या ताफ्याचं पारनेरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी निघाले आहेत. मुंबईत आंदोलनासाठी मोठी तयारीसुद्धा करण्यात आलीय. आंदोलकांनी सोबत महिनाभर पुरेल इतकं धान्य आणि इतर साहित्य घेतलं आहे.