महाभरतीत मराठा आरक्षणाचा लाभ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची महाभरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही पदे मराठा समाजासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. 

सरकारच्या विविध विभागांतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहिरात प्रसिद्ध केली असून, या रिक्त पदांच्या भरतीकरिता राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेतील सर्वाधिक म्हणजे २३० पदे ही महसूल विभागातील आहेत. उपजिल्हाधिकारी (गट-अ) साठी ४०, तहसीलदार (गट-अ) ७७, नायब तहसीलदार (गट-ब) ११३ अशा एकूण २३० पदांसाठी ही महाभरती होणार आहे.
हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचा कायदा सर्वत्र लागू झाला, आजच्या जाहिरातीमध्ये त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित ठेवल्या आहेत.

ऑनलाइन अर्जप्रक्रिया
सरकारच्या विविध विभागांतील पदांसाठी इच्छुकांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. अर्ज करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे व आयोगास अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

Web Title: Maratha Reservation MPSC Recruitment