मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार- खासदार संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार- खासदार संभाजीराजे

नांदेड: मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, हे मुक आंदोलन होतं, याआधी समाज बोललाय. मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही समन्वयकसुद्धा बोललोय. आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. एवढंच नाही तर कृती करून दाखवली पाहिजे.

आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांनी गर्दी केली आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात अशोक चव्हाण सहभागी होणार नाहीत. त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Maratha Reservation Nanded Sambhajiraje On Aarkshan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..