Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन होणार असून, राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. "आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही," असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. विशेष म्हणजे, आरक्षण न मिळाल्यास सरकार उलथवून टाकण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.