मराठा समाज सेवा मंडळ निवडणूक! सर्व संचालक मनोहर सपाटेंचेच विजयी होतील? पण अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये फाईट; मतदान अन्‌ निकाल २७ सप्टेंबरलाच

मराठा समाज सेवा मंडळाच्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात दहा संचालकांसाठी २० उमेदवारांनी तर अध्यक्ष, उपाध्यक्षासाठी प्रत्येकी दोन, जनरल सेक्रेटरी व खजिनदारासाठी प्रत्येकी तीन आणि सचिव पदासाठी दोन, असे अर्ज पात्र ठरले आहेत. २७ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येणार आहे.
Manohar Sapate Maratha community institution.

Manohar Sapate Maratha community institution.

Sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : येथील मराठा समाज सेवा मंडळाच्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात दहा संचालकांसाठी २० उमेदवारांनी तर अध्यक्ष, उपाध्यक्षासाठी प्रत्येकी दोन, जनरल सेक्रेटरी व खजिनदारासाठी प्रत्येकी तीन आणि सचिव पदासाठी दोन, असे अर्ज पात्र ठरले आहेत. २७ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येणार आहे.

निवडणुकीसाठी एकूण २२६ मतदार असून हे त्यातून पाच पदाधिकारी आणि दहा संचालक निवडले जाणार आहेत. सध्या अध्यक्षपदासाठी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरूद्ध रामचंद्र कदम, उपाध्यक्षासाठी अरुणकुमार सोमदळे आणि ज्ञानेश्वर सपाटे यांच्यात लढत होणार आहे. तसेच जनरल सेक्रेटरी प्रा. महेश मानेविरूद्ध मुकेश निकम आणि खजिनदारसाठी महादेव गवळी, ब्रह्मदेव पवार, विनायक पाटील यांनी तर सचिव पदासाठी राजेंद्र शिंदे व विनायक पाटील यांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय संचालक पदासाठी शिवदास चटके, नीलकंठ वाकचौरे, मंगेश जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, नागनाथ हावळे, नामदेव थोरात, मुकुंद जाधव, राजेंद्र शिंदे, प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, विनायक पाटील, कुमार गायकवाड, महादेव गवळी, सुरेश पवार, चेतन साळुंखे, मधुकर पवार, रेखा सपाटे, सुनीता भोसले, मारुतीराव गोरे यांचे अर्ज आहेत. यात सपाटे यांनी अध्यक्षपदासाठी दोन, तर प्रा. महेश माने यांनी जनरल सेक्रेटरी पदासाठी दोन अर्ज भरले आहेत.

दुसरीकडे ज्ञानेश्वर सपाटे यांनी संचालक व उपाध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणी अर्ज भरला आहे. तसेच विनायक पाटील यांनी संचालक, खजिनदार व सचिव या तिन्ही पदांसाठी, महादेव गवळी यांनी संचालक व खजिनदार अशा पदांसाठी अर्ज भरला आहे. तसेच राजेंद्र शिंदे यांचा संचालक व सचिव अशा दोन्ही पदासाठी अर्ज आहे.

निवडणुकीचा प्रोग्राम असा...

  • अर्ज माघार : १३ ते १६ सप्टेंबर

  • उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध : १६ सप्टेंबरला दुपारी

  • प्रचारासाठी कालावधी : १७ ते २५ सप्टेंबर

  • मतदान व मतमोजणी : २७ सप्टेंबर रोजी

मनोहर सपाटे यांचेच पारडे जड?

मराठा समाज सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या ॲड. रामचंद्र कदम यांना संचालक पदासाठी (१० जागा) एकही उमेदवार मिळालेला नाही. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव पदासाठी कदम यांचा उमेदवारच नाही. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार यांचीच निवडणूक होईल, अशीच सद्य:स्थिती आहे. संचालकांचे बहुमत असले तरीदेखील अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे निवडून यावेच लागते, अशी या मंडळाची घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com