मराठी राजभाषा दिन : बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट

मराठी राजभाषा दिन :  बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट

जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहात, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ' मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर ' कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे कोंकणी मराठी ,कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपूरी असे अनेकविध प्रकार कानांवर पडतात. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

मराठी राजभाषा दिन :  बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट
बँकेत Joint Savings Account उघडण्याचे अनेक फायदे, काय आहेत नियम, सुविधा?

महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत.

प्रत्येक प्रांताची जशी आपली एक खाद्यसंस्कृती असते तशी एक भाषाही असते. जशी ही खाद्यसंस्कृती दर कोसाला बदलत जाते तशी भाषेशी लय देखील बदलत जाते.त्यातल्या त्यात ग्रामीण भाषा तर अतिशय गोड असते. त्यात वापरले जाणारे शब्द रोजच्या व्यवहारात वापरले जात असले तरी ते प्रमाण मराठी भाषेत नसल्याने सहसा लिखानात येत नाही. शहरांमधे तर ते बोलण्यातही येत नाही.

आज महाराष्ट्रातील बोलीभाषेतील लोप पावत चाललेले शब्द आज खास मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही तुमच्याकरता घेऊन आलो आहोत

मराठी राजभाषा दिन :  बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट
तुमची मोटरसायकल चोरीला गेली आहे का?, मग ती परत मिळू शकते, कशी ते वाचा सविस्तर

चला तर मग पाहू बोलीभाषेतील शब्द

  • यळवाळी-संध्याकाळच्या आत

  • कव्हर- किती वेळात

  • उलसक किंवा उलीशीक- अत्यंत थोडे.

  • फिंद्री-खोडकर मुलगी

  • सागुती - कोंबडी/ मटण रस्सा , कोंबडी कालवण

  • पान शेंगा - माश्यांना विनोदाने म्हणतात.

  • चंडाळा - म्हाताऱ्या लोकांना त्रास दिल्यावर म्हणायचे आता कोणी म्हणत नाही.

  • मवं/ मपल - माझं

  • तुवं / तुपलं - तुझं

  • रामपहारी - सकाळी

  • चिडी- बत्तीचा लहान प्रकार

  • चाय्यठाळ - चावट , खोडखर

  • नादर - छान , उत्तम

  • ढवळा रंग - पांढरा रंग

  • तवरोक, तवरलोक - तोपर्यन्त

  • जवरोक, जवरलोक - जोपर्यंत

  • इदुळा - ह्या वेळेस

  • ईळभर -दिवसभर

  • पारभर -घटकाभर

  • आज आडदी -एक आठवड्यापूर्वी आजच्या दिवशी

  • रातसारी -रात्रभर

  • सांच्याला -संध्याकाळी

  • कवाच्यानं -केव्हापासून

  • हाळी -हाक

  • वाईसं -थोडं

  • वायलं -विभक्त/वेगळं

  • दमानं -हळू

  • शेणकुट -गोवरी

  • पायतान -चप्पल

  • कानकोंडा - एखादं लाजिरवाणं कृत्य केल्यामुळे किंवा चुकीचं वागल्यामुळे एखादा निमूटपणे जगतो, तेव्हा त्याला कानकोंडा म्हणतात

  • खटका - दाबायचे बटण

  • गुंडी - शर्टाचे बटण

  • आवतण - आमंत्रण

  • जांब - पेरू

  • फुई - आत्या

  • आखाजी - अक्षय तृतीयेचा सण

  • आखाडी - गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा होणार एक सण

  • टोंगळा - गुडघा

  • मसनवाटा - स्मशान

  • आईतवार- रविवार

  • खटुल-विमान

  • सांज-संध्याकाळ

  • भगुन-पातेल

  • झारी-घागर

  • आंगड-शर्ट

  • दुपाट-रुमाल

  • धनी-नवरा

  • चेंडुफळी-

  • आवस-अमावस्या

  • पुणव-पौर्णिमा

  • चऊत-चतुर्थी

  • तार-पत्र

  • सोडा- निरमा पावडर

  • फटफटी- मोटारसायकल

  • असे असंख्य शब्द आता मराठी माणसाच्या बोलण्यातुन हळु हळु हद्दपार होतं आहे.

मराठी राजभाषा दिन :  बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट
Russia Ukirane War Live : युक्रेनची राजधानी किवपासून रशियन सैन्य अवघ्या काही अंतरावर

मराठी भाषा जपली पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणजे नक्की काय ? फक्त मराठी बोलणे किंवा पोशाख घालणे म्हणजेच मराठी जपणे नाही. तर महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत- साहित्य परंपरा, मराठी संस्कृती ,मौखिक पद्धतीने साहित्यात आलेली मराठी या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि हाच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे. नुसता मराठीचा आव आणून काही होणार नाही तर मराठी बोलीभाषेतील लोप पावत चालले शब्द आत्मसात करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com