मराठीचा सन्मान आणि संवर्धन व्हावे - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला.

मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला.

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढताना आमदार छगन भुजबळ यांनी राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतोय. प्रत्येक नागरिकाच्या डोक्‍यावर  हजारांचे कर्ज होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सरकार मूलभूत सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरत आहे. सध्या राज्याला दुष्काळाच्या अतितीव्र झळा बसत असताना फडणवीस सरकार मात्र नारपारचे पाणी गुजरातकडे वळवू पाहत आहे. या धोरणाला भुजबळ यांनी विरोध केला.

गुजरातला पाणी न देता सरकारने हे पाणी मराठवाड्यासाठी सोडावे, असेही आमदार छगन भुजबळ  म्हणाले. गुजरातच्या सिंचन क्षमतेच्या तुलनेत महाराष्ट्राची क्षमता कमी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली. 
गेल्या काही वर्षांत चुकीच्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात प्रचंड पीछेहाट झाली आहे. भविष्यात कृषी क्षेत्राचा विकास खुंटू नये म्हणून राज्य सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Language Honor Promotion Chhagan Bhujbal