मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांची एकमताने निवड झाली. येत्या 13 ते 15 जून दरम्यान मुंबईमध्ये हे नाट्य संमेलन होणार आहे.

मुंबई - 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांची एकमताने निवड झाली. येत्या 13 ते 15 जून दरम्यान मुंबईमध्ये हे नाट्य संमेलन होणार आहे.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झाल्यानंतर मुंबई येथे गुरुवारी नियामक मंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक झाली. यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी नियामक मंडळाकडे कीर्ती शिलेदार, सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे असे तीन अर्ज आले होते.

नियामक मंडळाच्या बैठकीत कीर्ती शिलेदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची 2011 मध्ये सांगली येथे झालेल्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाली होती. तब्बल सात वर्षांनी हा मान पुण्याला मिळाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनीही नगर येथे झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते, त्यामुळे नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी अशा दोघींना हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: marathi natya sammelan chairman kirti shiledar